छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): वेडिंग फोटोग्राफीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वाढता वापर, आधुनिक तंत्रज्ञान आणि छायाचित्रणातील बदलत्या कार्यपद्धतींची माहिती देण्यासाठी एआय आणि वेडिंग फोटोग्राफी या विषयावर मोफत सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते. सयाजी हॉटेल येथे शुक्रवारी (दि.९) झालेल्या या सेमिनारमध्ये सुमारे १६० छायाचित्रकारांनी सहभाग नोंदविला. औरंगाबाद फोटोग्राफर असोसिएशन, वर्धमान फोटो एम्पोरियम आणि प्रोएवी
प्रोफेशनल ऑडिओ व्हिज्युअल यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला.
प्रसिद्ध पुरस्कार विजेते वेडिंग फोटोग्राफर रॉबिन सैनी यांनी यावेळी मार्गदर्शन केले. विविध एआय सॉफ्टवेअरच्या मदतीने दर्जेदार छायाचित्रे आणि व्हिडिओ
तयार करणे, वेडिंग फोटोग्राफीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणे आणि कामाचा वेग व गुणवत्ता वाढविण्यासाठी योग्य वर्कफ्लो विकसित करणे, याबाबत त्यांनी प्रात्यक्षिकांसह माहिती दिली. कार्यक्रमात रॉबिन सैनी, गणेश उमरीकर आणि निकेत जैन
यांचा अमोल बोराडे, गणेश भेरे आणि पुरुषोत्तम देशपांडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ऋषिकेश होशीग यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला, तर रमेश रावळे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी प्रकाश किनाळकर, आनंद काळे, संजय चौबे, अजय कस्तुरे, गणेश भेरे आणि सुनील छत्रे, विजय उरगुंडे, दीपक काकडे, सचिन गोडसे, अमृता दांडगे, पवन अहिरराव, रोहन सरसांडे, शुभम पडघन, तुषार बोराडे, सचिन चांदगुडे, भारत राठोड, रोहित राठोड आदी उपस्थित होते.
https://epaper.sanjwarta.in/
Powered By: Vrudhee Solutions














